Logo

सहा वर्षांत प्लास्टिक उद्योग गाठेल पाच लाख कोटी रुपयांचा पल्ला

JAIHINDNEWS

मुंबई : भारतातील प्लास्टिक उद्योग सध्या २.२५ लाख कोटींचा असून, तो २०२५ पर्यंत ५ लाख कोटी रुपयांचा पल्ला गाठेल आणि अपेक्षित ६० लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देत सर्वाधिक नोकऱ्या देणारा उद्योग ठरू शकेल, असा अंदाज आहे. भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यास प्लास्टिक उद्योग मदत करेल. मात्र त्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) ला सरकारने पाठबळ द्यायला हवे आणि तसेच पायाभूत सुविधा, सुलभ वित्रपुरवठा व साह्य करणारी नियामक धोरणे आखायला हवीत, असे आॅल इंडिया प्लॉस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरविंद मेहता यांनी सांगितले. असोसिएशनतर्फे मुंबईत प्रोसेसर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १५ राज्यांतील ८0 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. परिषदेत मिला जयदेव म्हणाले की, निर्यातवाढ व पर्यावरण यांच्याशी संबंधित समस्या सोडवणे आज गरजेचे झाले आहे. प्लास्टिक वापरूनही पर्यावरणाचे जतन हे आमचे घोषवाक्य आहे.