Logo

जगातील सर्वात श्रीमंत माणसाकडे आहे इतकी अमाप संपत्ती

JAIHINDNEWS

मेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांची गणना जगातील सध्याचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून केली जाते. उंची जीवन जगणाऱ्या जेफ बेजॉस यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. त्यातील काही गोष्टींचा घेतलेला हा आढावा. जेफ बेजॉस यांच्याकडे वॉशिंग्टनमध्ये एक घर आहे. एकेकाळी म्युझियम असलेल्या या घराची किंमत सुमारे १६० कोटी रुपये इतकी आहे. यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे विमान आहे. त्याची किंमत ६५ दशलक्ष डॉलर इतकी आहे. एक असे घड्याळ तयार करवून घेत आहेत जे १० हजार वर्षे चालेल. त्यासाठी त्यांनी २९३ कोटी रुपये खर्च केले आहेत. यांनी १४१ वर्षे जुने वृत्तपत्र असलेले वॉशिंग्टन पोस्टची खरेदी केली आहे. त्यांनी २३ कोटी डॉलरला या वृत्तपत्राची खरेदी केली होती.जेफ बेजॉस हे अंतराळ प्रवास नियमित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी ब्लू ऑरिजिन कंपनीची स्थापना केली आहे.