Logo

Challenge; अशी कॅच घेऊनच दाखवा, फुटबॉल किक अन् फलंदाज OUT!

JAIHINDNEWS

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची सर्वत्र चर्चा आहे आणि असायलाच हवी.मुंबई : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची सर्वत्र चर्चा आहे आणि असायलाच हवी. क्रिकेटचा महाकुंभमेळा म्हणून वर्ल्ड कप स्पर्धेकडे पाहिले जाते. पण, याचवेळी इंग्लंडमध्येच सुरू असलेल्या कौंटी क्रिकेटचीही हवा आहे. या स्पर्धेत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन खेळत आहे आणि त्याच्या वेगाचा बोलबाला आहे. त्यानं टाकलेल्या चेंडूचा वेध घेण्यास फलंदाजाला अपयश आले आणि तो त्रिफळाचीत झाला. याच कौंटी क्रिकेटमध्ये मंगळवारी एक अश्यक्य झेल घेण्यात आला. यावेळी यष्टिरक्षकाने चक्क फुटबॉल किकद्वारे प्रतिस्पर्धी फलंदाजाला झेलबाद करून माघारी पाठवले. हा सामना कोणत्या क्लब्समधील हे समजले नसले तरी ती कॅच सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.