Logo

युती असली तरी शिवसेना स्वतंत्र संघटना; पुढील वर्षी मुख्यमंत्री शिवसेनेचाच

JAIHINDNEWS

शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही 53 वर्षांची मजल मारू शकलो मुंबई - शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुखपत्र सामनाच्या संपादकीयमधून शिवसेनेने पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल असा निर्धार व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी "युती" जरूर आहे, पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. त्यामुळे उद्याची विधानसभा "भगवी" करून सोडू व शिवसेनेच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल या निर्धाराने काम करुया असं आवाहन सामनामधून शिवसैनिकांना करण्यात आलं आहे.