शिवसेनेला पुन्हा हुलकावणी; YSR किंवा BJD ला मिळणार लोकसभा उपाध्यक्षपदाची "बक्षिसी"?
नवी दिल्लीः मोदी सरकारचं संसदीय अधिवेशन 17 जून रोजी सुरू झालं असून, 26 जुलैपर्यंत चालणार आहे. याचदरम्यान मोदी सरकार स्वतःच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मांडणार आहे. यापूर्वीच लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करावी लागते, 17व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून राजस्थानमधील खासदार ओम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदासाठी YSR, शिवसेना की BJD या पक्षांच्या नेत्यांची चर्चा आहे. लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर एनडीएचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं दावा केला आहे. परंतु मोदी सरकार एनडीएच्या बाहेरच्या पक्षाला हे पद देऊ इच्छिते. शिवसेनेचे 18 खासदार असूनही त्यांच्या वाट्याला फक्त एकच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. एनडीएमध्ये भाजपानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर शिवसेनेनं दावा केला आहे. ती आमची मागणी नाही, तर तो आमचा नैसर्गिक अधिकार आहे. लोकसभेचे उपाध्यक्षपद हे आम्हालाच मिळालं पाहिजे, असंही संजय राऊतांनी सांगितलं होतं.