Logo

"पानिपत" मध्ये "या" अभिनेत्रीची झाली एन्ट्री, या अभिनेत्रीनं एकेकाळी बोल्ड भूमिकेतून गाजवली होती बॉलिवूड इंडस्ट्री

JAIHINDNEWS

आशुतोष गोवारीकर यांचा आगामी चित्रपट "पानिपत" बऱ्याच कालावधीपासून चर्चेत आहे. हा एक पीरिएड ड्रामा चित्रपट असून यातील अर्जुन कपूरचा लूक व चांगल्या स्टारकास्टमुळे हा चित्रपट सातत्याने चर्चेत येत असतो. आता पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटात आता एका दिग्गज अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलंय. या अभिनेत्रीने एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीत बोल्ड भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं. या अभिनेत्री म्हणजे झीनत अमान. 

सूत्रांच्या माहितीनुसार, "पानिपत" चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्या या चित्रपटात सकीना बेगमची भूमिका साकारताना दिसणार आहेत.