नोकरी हवीये? मग रोबोटने घेतलेली मुलाखत क्रॅक करण्याची तयारी ठेवा!
आता यापुढे व्हिडीओ/ऑडिओ रिझ्युम मागवले जातील. किंवा मुलाखत शूट केली जाईल. त्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले रोबोट पहिल्या टप्प्यात "लायक" उमेदवार निवडतील. त्या यंत्राच्या परीक्षेत पास झालात तर पुढे, नाही तर नो एण्ट्री!
जग किती वेगानं बदलतं आहे, हे वाक्यही आता जुनं झालं आहे. मात्र सध्या चर्चा आहे ती एका नव्या ट्रेण्डची. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची. यंत्रच माणसाची कामं करायला लागली तर माणसांचे रोजगार जातील अशी चिंता आहेच, त्यामुळे जॉब मार्केटवर परिणाम होण्याचीही चर्चा आहे.