नोकर्या कुणाला मिळतात? कुणाला मिळत नाहीत?
इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, कार्पोरेट जॉब, उच्च शिक्षण आणि आता गेली 3 वर्षे स्वतर्चा व्यवसाय. हा माझा स्वतर्चा प्रवास आहे. गेली निवडणूक ते ही निवडणूक या दरम्यान माझा हा प्रवास झाला आणि करिअर करणं म्हणजे नक्की काय याच्या सर्व बाजू सगळ्या अंगानं मला नीट बघता आल्या.
एकतर सध्या सर्वत्न चर्चा आहे की, नोकर्या नाहीत, जॉबलेस ग्रोथ वगैरे सुरू आहे. अशावेळी हे माझेच सगळे अनुभव पुन्हा नव्याने आठवत आहेत. कारण, हे सारं मी लिहित असतानाच आज माझ्या स्वतर्च्या कंपनीत पाच ओपनिंग आहेत. गंमत म्हणजे या पाच ओपनिंगसाठी अवघ्या 10 व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक मेसेज केल्यावर 200हून अधिक अर्ज आले आहेत. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे त्यातल्या एकालाही मी नोकरीवर घेऊ इच्छित नाही. म्हणजे मला मनुष्यबळाची गरज आहे, मात्र इच्छा असूनही मला माणसं मिळेनात आणि माझ्याकडे रिझ्यूम पाठवलेल्या अनेक तरुणांना जॉब लागेनात.