उदय टिकेकर यांच्या लोकप्रियतेचा असा झाला भूमिकेवर परिणाम
मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील जवळपास सर्वच माध्यमांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने वेगळे स्थान निर्माण केलेले अभिनेते म्हणजे उदय टिकेकर. सध्या स्टार प्लस वाहिनीवरील कसोटी जिंदगी की 2 या मालिकेत अनुराग बासूच्या वडिलांची म्हणजेच मोलोय बासूची भूमिका उदय टिकेकर साकारत आहेत.
लवकरच हि मालिका २०० एपिसोड चा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करणार असून सूत्रांच्या माहितीनुसार मोलोय बासू यांचे अपघाती निधन होऊन ही भूमिका अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेणार होती. मोलोय बासू या भूमिकेची वाढती लोकप्रियता आणि उदय टिकेकर यांचे अभिनय कौशल्य पाहता ही भूमिका वाढवण्याचा निर्णय चॅनेल आणि मालिकेच्या निर्मात्यांनी घेतला.