India Vs Afghanistan Live Score: विराट कोहलीची झुंज संपुष्टात, भारताला चौथा धक्का
भारत vs अफगाणिस्तान लाइव्ह स्कोअर: साउदॅम्पटन येथील हॅम्पशायर बाऊल येथे आज भारत आणि अफगाणिस्तान हा सामना रंगणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आतापर्यंत अपराजीत राहिलेला आहे. चार सामन्यांत तीन विजय आणि एक अनिर्णीत निकालासह भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानला पाच सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. उपांत्य फेरीतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले असले तरी उर्वरित चार सामन्यांत प्रतिस्पर्धींना धक्का देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.