India vs Pakistan : हरलं पाकिस्तान, ट्रोल झाली सानिया मिर्झा; दिलं सडेतोड उत्तर!
India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत 7 वेळा आमने- सामने आले आहेत. त्यात प्रत्येक वेळी भारतानेच विजय मिळवला आहे. मात्र रविवारी मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात भारतानं 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या, पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानला 40 षटकांत 212 धावाच करता आल्या. या पराभवाचं खापर पाकिस्तानच्या चाहत्यांनी भारताची टेनिसपटू सानिया मिर्झावर फोडले. पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिकची पत्नी असलेल्या सानियानेही नेटिझन्सला त्यांच्या भाषेत सडेतोड उत्तर दिले.