"चित्रपट संन्यास" वगैरे काही नाही; "झिरो" नंतर हा असेल अनुष्का शर्माचा नवा चित्रपट!!
बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा हिने "सुई धागा" आणि "झिरो" नंतर एकही चित्रपट साईन केलेला नाही. काही दिवसांपूर्वी अनुष्काने अभिनयातून संन्यास घेतल्याची चर्चा सुरु झाली होती, ती त्याचमुळे. अनुष्का अभिनयाऐवजी दिग्दर्शनावर लक्ष केंद्रीत करू इच्छिते, अशीही चर्चा होती. पण या चर्चेत काहीही तथ्य नव्हते, हे आता नव्याने स्पष्ट झाले आहे. कारण अनुष्काने तिच्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. होय, चर्चा खरी मानाल तर आपल्या नव्या चित्रपटात अनुष्का लेडी इन्स्पेक्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे अनुष्काने अभिनय सोडल्याची किंवा अभिनयातून संन्यास घेतल्याची चर्चा निव्वळ निराधार आहे.