काय म्हणता? कबीर सिंग नंतर शाहिद कपूरकडे नाही काम!
शाहिद कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रतिभावान अभिनेता आहे. आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक हिट चित्रपट दिलेत. कमीने, उडता पंजाब, जब वी मेट हे त्याचे चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावले. पण परफेक्ट बॉडी, टॅलेंट आणि अनेक हिट चित्रपट देऊनही शाहिदच्या करिअरचा ग्राफ वेगाने घसरताना दिसतोय. होय, लवकरच शाहिदचा "कबीर सिंग" हा सिनेमा प्रदर्शित होतोय. पण या चित्रपटानंतर शाहिदकडे एकही चित्रपट नाही. अलीकडे एका मुलाखतीत खुद्द शाहिदने हा खुलासा केला