सेक्रेड गेम्स २ च्या लाँचिंगची तारीख पुढे ढकलली, या महिन्यात पाहायला मिळणार ही वेबसिरिज?
सेक्रेड गेम्सच्या यशानंतर या वेबसिरिजचे चाहते सेक्रेड गेम्स २ ची आतुरतेने वाट पाहात आहेत. सेक्रेड गेम्स २ कधी सुरू होणार याविषयी नेटफ्लिक्सने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना संकेत दिला होता. त्यांनी १० मे ला इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे सेक्रेड गेम्स २ पुढील २५ दिवसांत सुरू होईल असा अंदाज लावण्यात येत आहे. पण हे २५ दिवस उलटून गेल्यानंतरही ही वेबसिरिज सुरू झाली नसल्याने आता ही वेबसिरिज कधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार याची सगळेच आतुरतेने वाट पाहात आहेत.