गृहपाठ: अभ्यास गणिताचा, विचार करिअरचा
गणित हा एक व्यापक विषय आहे. गणिताची व्यापक उपयुक्तता लक्षात घेऊन त्याचं मूलभूत तसंच व्यावहारिक ज्ञान आपल्याकडे असायला हवं. ज्यांना भविष्यात गणितामध्ये करिअर करायचं असेल, त्यांनी मूलभूत गणितीय संकल्पनांमध्ये प्रावीण्य मिळवायला हवं. गणिती संकल्पनांचा अर्थ समजावून घेणं, प्रश्न सोडवण्याच्या क्रि यांचा सराव करणं, एखाद्या समस्येला गणिती चौकटीत बसवणं आणि उत्तरांचा अर्थ काढणं हे गणिताच्या अभ्यासाचे प्रमुख घटक आहेत. वेगवेगळ्या शैक्षणिक पातळीवर गणिताचा अभ्यास करण्याचं तंत्रही वेगळं असतं. या गणिताचा करिअरच्या दृष्टीने विचार होणही महत्त्वाचं आहे.