महाराष्ट्र बजेट 2019: घोषणांचा पाऊस अन् मतपेरणी; राज्याचा "इलेक्शन स्पेशल" अर्थसंकल्प एका क्लिकवर
राज्याचा २०१९-२० चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या या अर्थसंकल्पात राज्याचा २०१९-२० चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या या अर्थसंकल्पात लोकाभिमुख योजना आणि सवलतींचा पाऊस पडला आहे. लांबलेला पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा कृषीउत्पादन आठ टक्क्यांनी कमी होईल, अशी चिंता आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बळीराजाला आधार देण्यावरच जास्त भर दिल्याचं एकूण अर्थसंकल्पावर नजर टाकल्यास लक्षात येईल.